Kolhapur Ganesh Festival | देखावे पाहण्यासाठी शहरवासीय रस्त्यावर
सजीव, तांत्रिक देखाव्यांसह विविध मूर्तींचे आकर्षण; रविवारी रात्रीपर्यंत रस्ते गजबजले

जनजागृती करणाऱ्या सामाजिक विषयांपासून इतिहासाची पाने उलगडणाऱ्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखाव्यांपर्यंत... तंत्रज्ञानाची करामत दाखवणाऱ्या हलत्या देखाव्यांपासून भव्य गुहा, प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृतींसह विविध रूपातील आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी रविवारी रात्रीपर्यंत शहर गर्दीने फुलून गेले. ‘चला देखावे पाहायला जाऊया’ हाच एक विषय आता कोल्हापूरकरांमध्ये चर्चेत आहे.
शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठ, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, शिवाजी उद्यमनगर, दुधाळी, फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, नागाळा पार्क, कसबा बावडा परिसरात देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. बच्चे कंपनीसह तरुणाई, ज्येष्ठांसाठीही आकर्षण असलेल्या गुहा, प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी रांग लागली होती. विविध रूपातील गणेशमूर्ती पाहण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्यामुळे गुरुवारी रात्रीपर्यंत हा माहौल असाच रंगणार आहे.
महाराष्ट्र मधील आणखी बातम्या

पिके होरपळणार; पाणीटंचाईची तीव्रता वाढणार
ऐन पावसाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी वेगाने खाली गेल्याने जिल्ह्यातील नदीपात्रातून केला जाणारा पाणी उपसा रविवारपासून अचानक पूर्ण बंद करण्यात आला. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. परतीच्या पावसाची आशा असली, तरी ढग येतात आणि जातात. रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो झिरमाट म्हणता येईल, असाही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी आहे. सध्या अनेक तालुक्यांत पिके होरपळली आहेत, तर उर्वरित पिकेही होरपळण्याची शक्यता आहे.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस
हवामान विभागाच्या अहवालानुसार यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.

योजना नोंदणी शिबिरे
नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन.


रस्ते दुरुस्तीला वेग
पावसाळ्यानंतर खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.
ट्रेंडिंग

संगणक साक्षरता उपक्रम
ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणक साक्षरता वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.

लघु उद्योग प्रदर्शन
स्थानिक लघु उद्योजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

शालेय क्रीडा स्पर्धा
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.


आंतरराष्ट्रीय व्यापार करार
विविध देशांदरम्यान व्यापार सुलभ करण्यासाठी नव्या करारांवर चर्चा सुरू आहे.

